‘मानवाचे अंती एक गोत्र’ हा आपला उत्क्रांती मंत्र असावयास हवा. आपण जैविक उत्क्रांतीबरोबरच सांस्कृतिक उत्क्रांतीची फलश्रुती आहोत!
जात-पात, उच्च-नीच अशा कल्पना उत्क्रांतीमध्ये, निसर्गात नसतात. त्या माणसाने जन्माला घातल्या आहेत. त्यापासून लवकर सुटका करून घ्यावयास हवी. निसर्गातील प्रेरणा युगानुयुगे समान राहतात, मात्र मानवी प्रेरणा दर पिढीगणिक बदलतात, उन्नत होतात. मुख्य म्हणजे तसे बदल करत करत आपण इथवर मार्गक्रमण करत आलेलो आहोत. कारण ‘थांबला तो संपला’! ‘मानवाचे अंती एक गोत्र’ हा आपला उत्क्रांती मंत्र असावयास हवा.......